उसाच्या शेतातून 21 लाख 87 हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा जप्त

हिंगोली जिल्ह्यातील हापसापुर शिवारात गांजाची शेती, २१ लाख ८७ हजार रुपये किमतीची झाडे जप्त...



हिंगोली, दि. १८:- वसमत तालुक्यातील हसापुर येथे एका शेतात पोलिसांनी तब्बल २१ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून हिंगोली जिल्ह्यात गांजाची झाडे जप्त करण्याबाबतची झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.



वसमत तालुक्यातील हपसापूर येथील एक शेतकरी गांजाची शेती करीत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी विशेष लक्ष घालत ही कारवाई फत्ते केली आहे. कारवाई मोठी असल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर यतिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीके मोरे कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गोपीनवार यांच्या पथकाला मोहिमेवर पाठविण्यात आले होते. शेतकरी नामदेव सूर्यभान सवंडकर याने त्याच्या वडिलांचे नावे असलेल्या शेतामध्ये चोरून ही झाडे लावलेली होती. पोलिसांनी ही सर्व झाडे ३४५ झाडे जप्त केली आहेत. या झाडांची किंमत २१ लाख ८७ हजार २०० रुपये एवढी आहे. या कारवाईत पोलीस हवालदार शेषराव लाखाडे, पोलीस नाईक शेख नयर, इमरान कादरी, पोलीस कॉन्स्टेबल महेश अवचार, अरविंद गजभार, राजाराम कदम, विशाल काळे, सुरज भिसे, चालक दांडेकर, होमगार्ड शेख अन्वर, विजय यंगडे यांनी सहभाग घेऊन केली आहे. सदर कार्यवाही तील सहभागी अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक हिंगोली राकेश कलासागर यांनी अभिनंदन केले असून यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम अधिक तीव्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांकडून गांजाची शेती करून घेण्यात आंतरराज्य डोळ्यांचा हात असतो. शेतातून निघालेला गांजा देशभरात ठिकाणी चोरीच्या मार्गाने विक्री होत असल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळे आता या काळ्या धंद्यात राज्य आणि देशपातळीवर कोण कोण मोठे मासे आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या कारवाईत पोलीस हवालदार शेषराव लाखाडे, पोलीस नाईक शेख नयर, इमरान कादरी, पोलीस कॉन्स्टेबल महेश अवचार, अरविंद गजभार, राजाराम कदम, विशाल काळे, सुरज भिसे, चालक दांडेकर, होमगार्ड शेख अन्वर, विजय यंगडे यांनी सहभाग घेऊन केली आहे. सदर कार्यवाही तील सहभागी अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक हिंगोली राकेश कलासागर यांनी अभिनंदन केले असून यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम अधिक तीव्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने