हिंगोलीत सामान्य रुग्णालयात अकरा हजार रुपयाची घेताना लिपिकास रंगेहाथ पकडले




अकरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपिकास रंगेहात पकडले 

हिंगोली-  वैद्यकीय बिलाची प्रक्रिया करून, जिल्हा कोषागार कार्यालयातुन बिल काढून देण्याच्या मागणीसाठी 11 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले. बऱ्याच दिवसापासून हा लिपिक लाचलुचपत विभागाच्या रडारवर होता. अखेर आज तो रंगे हात पकडल्याने पैशासाठी वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विनायक देशपांडे अस या लाचखोर लिपिकाच नाव आहे. या लिपिकाने तक्रारदाराच्या मुलीच्या वैद्यकीय बिलाची संपूर्ण प्रक्रिया करून ते जिल्हा कोषागार कार्यालयातून मिळवून देण्यासाठी अकरा हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने थेट हिंगोली येथील लाचलुचपत कार्यालय गाठून,  संबंधित लिपीका विरुद्ध तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली,  यामध्ये लिपिक हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.  त्यावरून आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्यचिकित्सक यांच्या केबिन जवळ लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला,  अन तक्रार दाराकडून 11 हजार रुपये स्वीकारताना लिपिक देशपांडे यास रंगेहात पकडले.   या कारवाईमुळे सामान्य रुग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात खळबळ जरी उडाली असली तरीही, अनेकांना पैशासाठी वेठीस धरणार्‍या या लिपिकास आज रंगेहाथ पकडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे


*अनेक दिवसापासून लिपिक होता लाचलुचपत विभागाच्या रडारवर*

दीपक देशपांडे हा कोणतेही शासकीय काम करण्यासाठी कर्मचार्‍यांकडून पैशाची मागणी करत असे,  पैसे असतील तर तो कर्मचाऱ्यांचे काम मार्गी लावत असे.  त्यामुळे त्याच्या या कामाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी हे चांगलेच वैतागून गेले होते.  अखेर आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे पूर्वी त्रास झालेल्या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. 


*यांनी केली कारवाई*
पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील , प्रभारी उपाधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुक ममता अफूने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने