हिंगोलीत. चोरीतील 23 मोटरसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोटारसायकल चोरीतील चार आरोपी गजाआड

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील २३ दुचाकी जप्त

हिंगोली - मागील वर्षात चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा तपास सुरू केला असता बुधवारी २३ मोटारसायकलीसह चार आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी सांगितले.

जिल्ह्यात मागील वर्षी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषणगाने गुन्ह्याचा तपास सुरू करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या . वसमत येथून सात, हट्टा एक, कुरुंदा एक, वसमत चौदा अश्या २३ मोटार सायकल चोरी गेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि विशेष मोहीम हाती घेत वसमत हद्दीत खबऱ्या कडून माहिती घेत ,मोटार सायकल चोरी करणारे तसेच विकत घेणारे लोकांची माहिती काढून मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपी शेख मूर्तुझा शेख 
मान्नान वय २१ वर्ष, उमेरखा उर्फ हाजी पिता बिस्मिलाखान वय २१वर्ष, शेख अझर शेख दिल्लू वय २६ वर्ष, आखाडा बाळापूर ,यासह त्यांच्या दोन साथीदारांना चोरीच्या मोटार सायकल वसमत व आखाडा बाळापूर येथे विक्री केल्या असल्या बाबत खात्री झाल्यावरून  सदर आरोपीच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जिल्ह्यातील चोरी केलेल्या दुचाकी ताब्यात घेतल्या.

तसेच आरोपीना विश्वासात घेऊन वसमत शहर, बाळापूर येथे मोटार सायकलचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री केलेल्या इसमाकडून जप्त करण्यात आल्या. अधिक विचारपूस केली असता कुरुंदा, जवळा बाजार, बाळापूर, भोकर, औरंगाबाद , येथून मोटारसायकल चोरी करून विक्री केल्याचे चौकशीत उघड झाले. आरोपीने एकूण २३ मोटारसायकल अंदाजे किमंत १५ लाख आहे. याशिवाय आरोपिकडून हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल मिळण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. तसेच वसमत ठाण्याच्या हद्दीतील मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी निहाल उर्फ बंगा पिता बालाजी डोईजड वय(२१),राहणार कोहिनुर कॉलनी यास ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर , अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय , यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. घेवारे, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत यांच्या पथकाने कामगिरी बजावली आहे. मोटारसायकल चोरीचा  उलगढा केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सर्वांचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने