हिंगोली जवळ 50 लाख रुपयांचा वाळू साठा जप्त..

 कर्तव्यदक्ष दंडाधिकारी  माचेवाड यांची  कारवाई..

तहसीलदार पांडुरंग माचेवाड

हिंगोली:-  तालुक्यातील दुर्ग धामणी शिवरा मध्ये असलेल्या गायरान जमिनीवर अज्ञात आरोपींनी साठा करून ठेवलेला 50 लाख रुपयांचा रेती साठा आज हिंगोली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी कारवाई करत जप्त केला.

तालुक्यातील दुर्ग धामणी  शिवारामध्ये मध्ये गायरान जमिनीवर अज्ञात पाच ते सहा आरोपींनी मोठ्या प्रमाणात रेती साठा केल्याची माहिती  तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना समजल्यानंतर त्यांनी  पथकासह आज  मंगळवारी पहाटे घटनास्थळी धाव घेऊन  रेती साठा जप्त केला. यानंतर वाहनाद्वारे सदर साठा हिंगोली तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आला असून यासंदर्भात पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान हा रेती साठा जवळपास 400 ब्रास असून याची किंमत साधारणपणे पन्नास लाख रुपय असल्याची माहिती 

माचेवाड यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला

बोलताना दिली.    मोठ्या कारवाईमुळे वाळू तस्करा मध्ये  खळबळ उडाली आहे.

दुर्ग धामणी परिसरात असणाऱ्या वाळू पट्ट्यातून ही वाळू उपसून गायरान जमिनीवर जमा करून त्यानंतर इतर ठिकाणी चोरीच्या पद्धतीने विक्री केल्या जात असल्याची माहिती सदर गावातील ग्रामस्थांनी दिली आहे.

हा साठ या भागात मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जमा असल्याची माहिती कर्तव्यदक्ष अधिकारी पांडुरंग माचेवाड  यांना माहिती मिळाल्याने आज सकाळी त्यांनी मोठी कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने