जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडून कोविड लसची पाहणी
हिंगोली - जिल्ह्यात ६ हजार ६६० कोविड लसीचे डोस उपलब्ध झाले असून त्याची जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी गुरुवारी पाहणी करून वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लस काढली असून बुधवारी जिल्ह्यात उपलब्ध देखील झाली आहे.या लसीचे डोस जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी त्या ठिकाणी जाऊन किती डोस उपलब्ध झाले याचा आढावा घेतला. शुक्रवारी( ता.१६) कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील १०० लोकांना पहिल्या टप्यात लसीचे डोस देण्यात येणार आहे ,तर हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातील १०० अशी एकूण २०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिली जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, खाजगी डॉक्टर, रुग्णालयातील स्टाफ यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ. गोपाल कदम, डॉ. देवेन्द्र
जायभाये, सुनील जगताप आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा