हिंगोली जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या होणार एकसारख्या

*हिंगोली जिल्ह्य़ातील सर्व अंगणवाडी केंद्रे होणार एकसारखी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम*

हिंगोली प्रतिनिधी
     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातुन जिल्ह्य़ातील सर्व अंगणवाडी केंद्रात एकजिनसीपणा व सारखेपणा असणेसाठी दर्शनी भाग सारखा रंगविण्यासाठी एक डिझाईन निश्चित करुन सर्व अंगणवाडी केंद्राना सारखी रंगरंगोटी व बोलकी चित्रे काढण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची सुरवात केली.याची सुरवात आज हिंगोली तालुक्यातील खानापूर येथील अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटीने सुरू झाली*. 
*श्री. राधाबिनोद शर्मा यांनी हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली यामध्ये झिरो पेंडसी व डेली डिस्पोजल''संकल्प अभियान सुंदर कार्यालय अभियान, पेंशन सेल, स्वच्छ कार्यालय अभियान, वृक्षारोपण अभियान यासारखे उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्य़ातील अंगणवाडी केंद्राना भेटीदरम्यान वेगवेगळे रंग व काही ठिकाणी विना रंगरंगोटी च्या इमारती आढळल्याने श्री. शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एकजिनसीपणा व सारखेपणा असणेसाठी दर्शनी भाग सारखा रंगविण्यासाठी डिझाईनची निवड करुन सर्व अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्याच्या सर्व गटविकास अधिकारी यांना सुचना दिल्या*.  *यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील 15 व्या वित्त आयोगातुन महिला व बालकल्याण विभागागासाठी राखीव असणारा 10% निधीचा उपयोग ग्रामसेवक यांनी करणेबाबत सुचना दिल्या*. *या अभियानाची सुरुवात होणे पूर्वी श्री. राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच श्री. शेंगुलवार अति मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. धनवंतकुमार माळी सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्रवि) ,व श्री. गणेश वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा. क)यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षिकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले*
*आज श्री. डाॅ. पोहरे गटविकास अधिकारी हिंगोली व श्री भोजे विस्तार अधिकारी यांनी खानापूर येथील अंगणवाडी केंद्राची इमारतची रंगरंगोटी व बोलकी बनविण्यास सुरुवात करुन या अभियानाची सुरुवात केली येत्या आठवडय़ात पुर्ण जिल्ह्य़ातील अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्याचे काम होणार आहे. या अभियानामुळे बालकांना रंगरंगोटी व बोलक्या अंगणवाडीची इमारती भेटुन त्यांचा अंगणवाडीत येण्याचा उत्साह वाढणार आहे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने