विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल या राष्ट्रीय NGO च्या वतीने आज दि.25.01.2021 रोजी पालक मंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्रीमती वर्षाताई मॅडम,याना हिंगोली तालुक्यातील धान्य घोटाळाचे सविस्तर निवेदन देऊन मांगणी करण्यात आली की तत्कालीन तहसिलदार श्री गजानन शिंदे, नायब तहसीलदार श्री एस.जी.खोकले, तत्कालीन अव्वल कारकुन श्री केलास वाघमारे, गोदामपाल/अति.पदभार अव्वल कारकुन श्री इम्राण पठाण, अव्वल कारकुन श्रो बी.बी. खडसे या सर्वांनी काही रास्त दुकानदाराशी संगनमत करत शासकीय नियमाप्रमाणे आवश्यक असलेली अनेक अभिलेखे आणि दस्ताऐवज पुरावे नष्ट करुन कोट्यावधीचे आर्थिक गैरव्यवहार करुन शासनाची फसवणुक करून शासन नियमाचे उल्लंघन करत जानेवारी 2019 ते जुले 2019 या कालावधीत ऑफलाईन पध्दतीने नियतनापेक्षा जास्त 11 हजार 377.07 क्विटल गहु व 4 हजार 890.815 क्विटल तांदुळ असे एकुण 16 हजार 267.88 क्विटल धान्याचा जास्तीचा पुरवठा करुन ज्याची बाजार भाव मुल्य (Economic Cost) एकुण रुपये 4 कोटी 61 लाख 23 हजार 458.44 चा अपहार करुन जाणीवपुर्वक पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य लाभापासुन वंचित केले. म्हणुन वरील दोषी अधिकारी तत्कालीन तहसिलदार श्री गजानन शिंदे, नायब तहसीलदार श्री एस.जी. खोकले,तत्कालीन अव्वल कारकुन श्री केलास वाघमारे, गोदामपाल/अति.पदभार अव्वल कारकुन श्री इम्राण पठाण, अव्वल कारकुन श्रो बी.बी. खडसे आणि काही रास्त
दुकानदाराविरुध्द अपहाराचा व भारतीय दंड विधान सहिता प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करावी आणि अपहाराची सर्व रक्कम संबंधिताच्या पगारातुन किंवा त्यांच्या वैयक्तीक संपती जप्त करुन वसुल करावी व त्यांना तात्काळ निलंबीत करुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 चे कलम 3(अ) कलम 8 ब कलम 12 अन्वये एकत्रित विभागीय चोकशी करावी. *अश्या मांगणीचे निवेदन संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या हस्ते सादर करण्यात आले निवेदन स्वीकारून मा.पालक मंत्री महोदयांनी दोषींवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनवर कारवाई चे आश्वासन दिले*
या वेळी सोबत जिल्हा अध्यक्ष तौफिक अहमद खान,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद,रवि ब.जैस्वाल,शेख बासित,शेख नफीस पहेलवान,शेख जमील बागबान,साजिद खान,शेख अवेज,शेख तुफेल बागबान,नितीन तपासे,शेख अदनान पहेलवान आदी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा