महिला व्यापारी जिल्हाध्यक्षपदी सुनिता मुळे यांची निवड

हिंगोली जिल्हा व्यापारी महिलामहासंघाची कार्यकारणी जाहीर. 



हिंगोली जिल्हा व्यापारी महिला महासंघाच्या कार्यकारणी संदर्भात आज दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता  शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्रीमती सुनिता माणिकराव मूळे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन घुगे, सचिव प्रकाशजी सोनी, शहर अध्यक्ष पंकज अग्रवाल, कोषाध्यक्ष सुदर्शन कंदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हिंगोली जिल्हा व्यापारी महिला महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी श्रीमती सुनीता माणिकराव मूळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सौ. तेजस्विनी वामनराव टाकळगव्हाणकर, सौ.राणी सुनील खिल्लारी, सौ.किर्ती लदनिया,सौ.  सोनाली परतवार, यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिवपदी सौ. ज्योती मधुसुदन अग्रवाल, 
कोषाध्यक्ष पदी सौ. अश्विनी मिलिंद यंबल यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी सौ.नम्रता साखळे, सौ. उषाकिरण गायकवाड, सौ. प्रणिता पराग कौलवार, सौ. शारदा नागनाथ बोजेवार औंढा नागनाथ, सौ. जयश्री नागरे औंढा नागनाथ, सौ.वर्षा देशमुख कळमनुरी, सौ.शिखा सचिन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा व्यापारी महिला महासंघाच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी महिलांना संबोधित करताना असे सांगितले की आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेतृत्व करत आहेत. महिला व्यापारी मध्येही  सहभागी होत असून आपला व्यवसाय सुरळीत पणे चालवून आपली आर्थिक स्थिती चांगली करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने