*हिंगोली जिल्ह्य़ातील आजपर्यंत 740 अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटी, एकसमान रंगरंगोटी व बोलक्या अंगणवाडीची 100% कडे वाटचाल*.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 962 अंगणवाडी इमारतीपैकी 740 इमारतीची एकसमान रंगरंगोटी आजपर्यंत पुर्ण होऊन हिंगोली जिल्ह्य़ातील अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटीची 100 %कडे वाटचाल सुरू आहे. 199 अंगणवाडी केंद्रांची रंगरंगोटी बाकी असुन युद्धस्तरावर रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंगणवाडी केंद्राना एकजिनसीपणा व सारखेपणा येण्यासाठी एकसमान रंगरंगोटीचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये श्री. अनुप शेंगुलवार अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धनवंतकुमार माळी, डॉ. पोहरे, श्री गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत जिल्ह्यातील 992 ईमारतीपैकी 740 अंगणवाडीची एकसमान रंगरंगोटी व बोलक्या अंगणवाडीचे काम पूर्ण झाले. 199 अंगणवाडीची रंगरंगोटीचे काम बाकी असुन जिल्हाची 100 %कडे वाटचाल सुरू असून पुढिल आठवड्यापर्यंत संपूर्ण अंगणवाडीची रंगरंगोटी होईल. असे झाल्यास हिंगोली जिल्हा अशाप्रकारे एकसमान रंगरंगोटी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा