मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिव जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजन
हिंगोली/ प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्यावतीने 18 फेबु्रवारी रोजी महिला व मुलीसाठी शिव सन्मान मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात गुरुवारी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिव जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा छायाताई मगर, सचिव ज्योतीताई कोथळकर, कार्याध्यक्षा सुनिताताई मुळे, कोषाध्यक्ष विद्याताई पवार, उपाध्यक्षा समितीचे मार्गदर्शक शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरु झालेली ही मॅरेथॉन स्पर्धा पोस्ट ऑफीस रोड, आखरे मेडिकल, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, अग्रेसन चौक, जुनी जिल्हा परिषद रोड, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक मार्गे छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. मुलींच्या गटामध्ये प्रथम अश्विनी मदन जाधव, द्वितीय तनवी गजानन कोरणे, तृतीय संस्कृती गजानन वऱ्हाड, प्रोत्साहनपर सायली अरुण शिंदे, तर महिला गटामध्ये प्रथम प्रियंका दशरथ पाईकराव, द्वितीय कोमल मदन जाधव, तृतीय ज्योती शंकर गवते, प्रोत्साहनपर परिमाला बालासाहेब मगर यांनी यश मिळविले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून 19 फेबु्रवारी रोजी मुख्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समिती प्रमुख ज्योती वाघमारे, ज्योतीताई धुळे, सदस्या वैशाली खरटमळ, सोनी शेळके, ज्योतीताई वाढवे, संजिवनी मसळे, सुरेखा लोखंडे, दिपा शेळके, दामिनी भुमरे यांच्यासह शिव जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
--------------
शिव जन्मोत्सव समितीच्यावतीने 500 कोरोना योध्दांचा सन्मान
हिंगोली/ प्रतिनिधी
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता जिल्हा प्रशासनातील कोरोना योध्दांनी मोठे योगदान दिले आहे. 18 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्यावतीने येथील पुर्णाकृती पुतळा परिसरात 500 कोरोना योध्दांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
कोरोना योध्दा सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रमुख उपस्थिती म्हणून आ. तान्हाजीराव मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक राजेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदींची उपस्थिती होती. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या 500 कोरोना योध्दांचा जिल्हाभरातील परिचारीका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शिव जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा छायाताई मगर, कार्याध्यक्षा सुनिताताई मुळे, सचिव ज्योतीताई कोथळकर, उपाध्यक्षा अनिता सूर्यतळ, कोषाध्यक्षा विद्या पवार यांच्यासह समितीचे मार्गदर्शक, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी समिती प्रमुख सहायक आधीसेविका ज्योतीताई पवार, रेखाताई शिंदे, सदस्या वंदना पांचाळ, अमिरा गावीत, हेमा पाडवी, सुषमा कदम, आरती गायकवाड, कल्पना डाके, प्रिती धबडगे यांच्यासह सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा