हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील
वायचाळ पिंपरी ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची लढत होउन दोन्ही पॅनलचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले होते.
त्यापैकी एका पॅनलची महिला सदस्य ही अगोदरपासूनच बिनविरोध निवडून आली होती. मात्र, बिनविरोध निवडून आलेली महिला निकाल लागल्यापासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पॅनलमधील सदस्यांना समोरच्या पॅनलच्या सदस्यांवर शंका होती. संबंधित महिला समोरच्या पॅनलच्या सदस्यांसोबत सहलीला गेल्याचा अंदाज काही लोकांनी वर्तवला होता.
दरम्यान, वायचाळ पिंपरी ग्रामपंचायतीचा आज सरपंचपदाची निवड करण्यात येणार होती. यासाठी बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्य सुमन सातकर या ग्रामपंचायतीत दाखल झाल्या. निवडणुकीच्या निकालापासून गायब झालेली महिला सदस्य अचानक सरपंचपदाच्या निवडीच्या वेळी दाखल झाल्याने गावकऱ्यांना धक्काच बसला. त्या महिलेला ज्या लोकांनी बिनविरोध निवडून आणलं होतं त्यापैकी काही महिला तिच्याजवळ गेल्या. व
जवळ जाऊन तिला काही सदस्य महिला व पती यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले
अद्यापही गोरेगाव परिसरात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता
मात्र घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला असे गावकरी यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा