संचार बंदी चे नियम तोडल्यास होणार कठोर कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रभावामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मागील एक मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी चे आदेश लागू असून
नागरिक व राजकारणी लोक जाणीवपूर्वक संचारबंदी उल्लंघन करत करताना शासनाच्या निदर्शनास आले
त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यातील लग्न समारंभ राजकीय बैठका यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही धार्मिक कार्यक्रम घेतल्यास त्याच्यावर
तातडीने
कारवाई होईल अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले
जिल्ह्यातील विनाकारण फिरणारे जाणीवपूर्वक गर्दी करणे सार्वजनिक ठिकाणी बैठका घेणे
लग्नसमारंभासाठी परवानगी घेणे बंधनकारक राहील
तसेच आस्थापना चालकांनी गर्दी केल्यास त्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत
विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करू असे पत्रकार परिषद मध्ये बोलतांना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा