हिंगोली शहर पाच दिवसापासून अंधारात वीज वितरण कंपनीचे कोट्यावधी रुपये थकले

हिंगोलीतील चार दिवसापासून पथदिव्ये  बंद वीजपुरवठा खंडित 

 पालिकेकडे कोट्यवधीची थकबाकी, पालिकेने गुरुवारी भरले ५४ लाखं रुपये


हिंगोली,  -   नगपालिकेकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची थकबाकी  असल्याने  शहरातील रस्त्यावरील पथदिव्याचा तसेच सिध्देश्वर व डिग्रस कर्हाळे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या विजेच्या पुरवठा खंडित करण्यात आला. शहरवासीयाना  चार  दिवसापासुन निर्जळीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी पालिकेने शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याची चांगलीच धास्ती घेत पालिकेने तातडीने ५४ लाख २३ हजाराचा भरणा केला. तरी देखील हिंगोली शहर अंधारात सापडले आहे.

 मार्चएण्डच्या उदिष्टपूर्तीसाठी महावितरण कडून वसुली मोहीम राबविली जात आहे. हिंगोली नगर पालिकाला महावितरण कंपनीने दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याची कोटयावधी थकबाकी आहे. हिंगोली शहरास सिद्धेश्वर धरणातुन पाणी पुरवठा केला जातो तर डिग्रस कर्हाळे येथे या पाण्याचे जलशुद्धीकरण केले जाते. त्यासाठी दोन्ही ठिकाणी पंपीग स्टेशनवर महावितरण  विज पुरवठा केलेला आहे. सिध्देश्वर येथील विजेचे महावितरणने यापूर्वी २३ कोटी

८९ लाख रूपये व चालू आर्थिक वर्षाचे  २ कोटी २ लाख ५६ हजार रुपये थकीत आहेत. त्याप्रमाणे डिग्रस येथील जलशुद्धीकरणाचे पूर्वीचे १० कोटी  ५६ लाख रुपये थकीत आहेत चालू आर्थिक वर्षाचे ६२ कोटी ५६ लाख थकीत आहेत.

त्यामुळे चालू आर्थिक वर्षात एक कोटी ६४ लाख ५६ हजार रुपयाची थकबाकी नगरपालिकेने भरावी अशा सुचना महावितरणने दिल्या होत्या परंतु १६ मार्च रोजी  केवळ  २२ लाख रुपयाचा धनादेश महावितरणला दिला  होता ,परंतु  ही रक्कम घेण्यास नकार देऊन चालू आर्थिक वर्षाची रक्कम देण्यास सांगितले होते.  त्याप्रमाणे शहरातील रस्त्यावरील पथदिव्यांकरीता देण्यात येणाऱ्या विजेची थकबाकी  नगर पालिकेकडे सात कोटी रुपयांची थकबाकी  असून चालू आर्थिक वर्षात  ४० लाख रुपये थकित आहेत.  किमान चालू आर्थिक  वर्षाचे  ४० लाख रुपये भरणा करावा असे महावितरणचे म्हणने आहे. मात्र ऐवढ्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यास  नगर पालिकेने  असमर्थता दर्शविल्याने १६ मार्च रोजी शहरातील विज पुरवठ्याचा तसेच सिध्देश्वर व डिग्रस  येथून पाणी पुरवठा करणाऱ्या विजेचा पुरवठा बंद करण्यात आला . परिणामी दोन दिवसापासून रात्रीच्या सुमारास शहरवासीयांना पथदिव्या अभावी अंधारातच राहावे लागले.

 त्याप्रमाणे पाणी पुरवठ्याची विज पुरवठा खंडित  केल्याने शहरात निर्जळीचा सामना करावा लागला  आहे.


चौकटीचा मजकूर

-----------------------

पालिकेकडे जवळपास ३४ कोटीची थकबाकी आहे,यावर्षीची १ कोटी ६४ लाख भरणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, गुरुवारी पथदिव्यांची न भरता केवळ पाणी पुरवठ्याच्या अगेन्स्ट ५४ लाख २३ हजाराचा भरणा पालिकेने केला आहे. किमान एक कोटी रक्कम भरल्याशिवाय पथदिव्यांची वीज सुरु केली जाणार नाही. नागरिकांनी, यासाठी विजवितरणला सहकार्य करावे,वीज काही फ्री मध्ये मिळत नाही  तयार करावी लागते , यासाठी शासनाला वीज निर्मिती साठी करोडो रुपयांचा खर्च होतो, त्यामुळे वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने