हिंगोली नगरपालिका ची मोठी कारवाई तीन शाळेने कर न भरल्याने केले दरवाजे बंद

हिंगोली नगरपालिका दणका   तीन  शाळेचे दरवाजे केले  बंद 

कर वसुली थकीत प्रकरण

महाराष्ट्र 24 न्यूज 
हिंगोली नगर पालिकेच्यावतीने वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नगर पालिकेची थकबाकी थकवणाऱ्या शहरातील 3 शाळा पथकाने बुधवारी सील केल्या आहेत. त्यामध्ये शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय हिंगोली, जुनी मल्टीपर्पज हायस्कुल जि.प. हिंगोली व जि.प. कन्या शाळा हिंगोली यांचा समावेश आहे. यांच्याकडे एकूण 21 लाख 24 हजार 744 ऐवढी थकबाकी आहे.हिंगोली नगर पालिकेच्यावतीने कर वसुलीची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील थकबाकीदारांचे नाव गांधी चौकात बॅनरवर लावण्यात आले होते.

आता नगर पालिकेने थेट कर थकविणाऱ्या तीन शाळा सील बंद केल्या आहेत. येथील शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय हिंगोली यांच्याकडे 2002-03 ते 2020-21 पर्यंत 8 लाख 16 हजार 940 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे. तसेच जुनी मल्टी पर्पज हायस्कुल जि.प. हिंगोली यांच्याकडे सन 2009-10 ते 2020-21 या कालावधीतील 5 लाख 24 हजार 162 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे. तर जि.प. कन्या शाळा हिंगोली यांच्याकडे सन 2004-05 ते 2020-21 या कालावधीतील 7 लाख 83 हजार 642 एवढी थकबाकी आहे. वरील तीन्ही शाळांची मिळून एकूण थकबाकी ही 21 लाख 24 हजार 744 रुपये ऐवढी आहे. या शाळांना नगर पालिकेच्यावतीने बील देवून चालू वर्षाच्या कराची मागणी करण्यात आली होती.
नगरपालिकेच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांना दणका  बसू शकते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने