राज्यात पुन्हा कडकडीत लॉक डाऊन? मुख्यमंत्री ठाकरेंनी केले मोठे विधान

राज्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन ? मुख्यमंत्री ठाकरेंनी केले ‘हे’ मोठे विधान 


 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल का ? अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.राज्यातील रूग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊन करणे हा एकच पर्याय समोर दिसत आहे मात्र ते लगेचच करणार नाही.आता लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे असे सांगतानात, लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे’, अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना वजा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.काल तर सर्वांधिक रूग्णांची नोंदली गेली आजही राज्यात २५ हजार ६८१ रूग्णांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितल्यानंतर आज नंदुरबार मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.राज्यातील रूग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊन करणे हा एकच पर्याय समोर दिसत आहे मात्र ते लगेचच करणार नाही.आता लोक मास्क वापरू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे पण अजूनही लोकांकडून सहकार्य हवं आहे असे सांगतानात, लॉकडाऊन टाळायचा असेल तर स्वयंशिस्त पाळावीच लागणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.परदेशात आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन आपल्याकडे आला आहे मात्र त्याचे आकडे नियंत्रणात आणण्यात यश आले होते. त्यामुळे आता ज्या वेगाने कोरोना पसरत आहे त्याचे नेमके कारण काय, हा नवा विषाणू आहे का, याचा शोध घेतला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने