*सोमवारपासून दिवसाची संचारबंदी शिथिल*
* मात्र रात्रीची संचारबंदी कायम लागू*
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आदेश
*महाराष्ट्र 24 न्यूज*
*बिबीशन जोशिले/ सुधाकर*
*मल्होत्रा*
हिंगोली - जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सात दिवसाची संचारबंदी लागू केली होती. त्यानुसार आता जिल्हाधिकारी जयवंशी यांनी रविवारी पुन्हा आदेश काढले असून सोमवार पासून किराणा, भाजीपाला, या आस्थापणाना वेळे नुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र इतर आस्थापणाना परवानगी शिवाय दुकाने उघडता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. सात दिवसाच्या संचारबंदी शिथिल करून सोमवारपासून काही दिवस कोरोना रुग्ण वाढतात की कमी होतात यावर सर्व काही डिपेंड आहे. मात्र सोमवार पासून मेडिकल ,
दूध व्यवसाय ,भाजीपाला ,फळ मटणाची दुकाने, दारू विक्रेते,दिलेल्या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी असेल, परंतु या करता व्यापारी व दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक असून अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच दुकान उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे .
दूध विक्री सकाळी सात ते दहा या वेळेत तर सायंकाळी सात ते नऊ यावेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक राहील.
औषधी दुकानासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत , त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत
सर्वसामान्यांसाठी बँकेचे व्यवहार सुरू राहतील, हिंगोली आगारातील बसेस प्रवाशांना खुले राहतील ,परंतु बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसला शासकीय बस स्थानका शिवाय कुठेही थांबण्यास परवानगी दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय सुरू राहतील, बसस्थानकामध्ये कोरोना चाचणी पथक पुढील आदेशाप्रमाणे सुरू राहतील. तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांना
दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल,
लग्न समारंभासाठी केवळ ५० व्यक्तींना परवानगी दिली जात आहे.
तसेच लग्नसमारंभ मोकळ्या जागेतच करावे लागणार आहे, यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
अंत्यविधीसाठी केवळ
वीस व्यक्तीना परवानगी असेल,
परवानगी दिलेल्या आस्थापना शिवाय
इतर कोणत्याही खाजगी दुकानदारांना दुकान उघडण्यास परवानगी नाही,
काय राहणार बंद
--------------------
जिल्ह्यातील शाळा ,महाविद्यालय, चित्रपट, लॉन्स, मंगल कार्यालय, जलतरण तलाव, हे पूर्णतः बंद राहतील, तसेच रेस्टॉरंट्स, बियरबार
उघडण्यास परवानगी नसेल,
नागरिकांच्या सोयीसाठी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असेल.
जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद राहतील. धार्मिक, राजकीय, सामाजिक, या कार्यक्रमास सुद्धा मिरवणूकिवर बंदी असेल,
धरणे, आंदोलने ,उपोषणे यावर सुद्धा बंदी असेल.
कायद्याचे उल्लंघन केल्यास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच बाजारपेठेत फिरत असताना मास्क ,सामाजिक अंतर पाळणे या बाबी बंधनकारक राहणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा