अंगणवाडी सेविकेला लूटमार करणाऱ्या आरोपीच्या सहा तासांमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक लाख 16 हजार 399 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बासंबा हद्दीत झालेल्या चोरीतील आरोपींना चोवीस तासाच्या आत बेड्या

एक लाख 16 हजार 399 रूपाचा मुद्देमाल जप्त


 बासंबा येथे अंगणवाडी सेविकेला लुटण्यात आले होते, अंगणवाडी सेविका हिंगोली येथील कामकाज आटपून मुलासह सिरसम ला जात होत्या 30 मार्च रोजी बासंबा शिवारात लपून बसलेले दरोडेखोर यांनी अंगणवाडी सेविकेला थांबवत अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील दोन सोन्याचे हार ,अँड्रॉइड मोबाइल  पर्स मधील काही पैसे ,बँकेचे पासबुक जबरदस्ती करत लुटले अंगणवाडी सेविका ने तात्काळ बासंबा पोलीस स्टेशन शिपाई अश्रू जी काकडे यांना कळविले ,पोलीस शिपाई आश्रुजी काकडे यांनी तात्काळ बासंबा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांना घडलेली घटना कळवली ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू  यांना घडलेली घटना कळता च सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल पिलू यांनी पोलीस स्टेशन चा स्टॉप पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगन पवार ,सतीश शेळके ,राहुल तड ,कसे यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, 
साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश  मलपिल्लू  यांच्या सह रिवाड जाहीर

घटनास्थळी दाखल होताच आरोपी फरार झाले पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू   यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक राकेश कलासागर  अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ,उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना घटलेली घटना कळवली तात्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय त्यांचे पथक, हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक बंद खडके त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी  अंगणवाडी सेविकेला विचारपूस केली अंगणवाडी सेविकेच्या माहितीनुसार शोध मोहीम राबविण्यात आली बासंबा गाव परिसरातून गुन्ह्यातील दोन आरोपी त्र्यंबक आनंदराव पवार, आत्माराम लोडबा कोठुळे ,राहणार बासंबा यांना ताब्यात घेतले परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता पोलिसांनी मुख्य आरोपीची शोधमोहीम चालू ठेवत अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, सतीश शेळके ,यांनी यातील मुख्य आरोपी वसंता उर्फ बंडू रामराव घुगे याला अटक केली ,पोलिसांनी आरोपीला विचारपूस केली असता मुख्य आरोपी वसंत घुगे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपीला न्यायालयात हजर केले असता  तीन मार्चला पोलीस कोठडी रिमांड मिळाला ,आरोपी रिमांड मध्ये असताना आरोपींकडे तपास करून मुख्य आरोपी वसंता उर्फ बंडू रामराव घुगे याने कबुली दिली अंगणवाडी सेविकेच्या गळ्यातील सोन्याचे गहू मन्याची पोत तसेच सोन्याची मनी मंगळसूत्राची पोत ,अँड्रॉइड मोबाईल रक्कम चारशे रुपये लुटल्याचे आरोपींनी कबुली दिली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असे एकूण एक लाख 16 हजार 399 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय त्यांचे पथक हिंगोली ग्रामीण पोलीस निरीक्षक बंदखडके  त्यांच्या पथकाने तसेच बासंबा येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल पिलू  पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले, सहायक उपनिरीक्षक मगन पवार ,सतीश शेळके ,प्रवीण राठोड  राहुल तडकसे  अश्रूजी काकडे पोलिस स्टेशन मधील होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेत आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक केली गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने