*महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण*
हिंगोली,दि.01: जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण समारोह संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक संदिपसिह गील, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा मुद्रांक अधिकारी संजय पाटील, तहसिलदार पांडुरंग माचेवाड यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा