हिंगोलीत ईद च्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना अन्नधान्य किट चे वाटप हिंगोली पोलिसांचा उपकरणे


*लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर व रमजान ईदच्या निमित्ताने गरजूंना मोफत धान्य व कपडे वाटप करून हिंगोली पोलीस दलाने घडवले माणुसकीचे दर्शन*

  पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर हे कायद्या प्रती व गुन्हेगारा प्रति जेवढे कठोर आहेत तेवढेच  समाजाप्रती संवेदनशील  सुद्धा असल्याचे नुकतेच पहावयास मिळाले आहे.
               कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापासून असलेल्या लॉक डाऊन मुळे अनेक गोरगरीब मजूर कारांची  व हातावर संसार असणाऱ्यांची चुल बंद होती.  सदरची बाब पोलीस अधीक्षकांनी हेरून रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कलासागर यांनी  जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सूचना केली की आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीतील हातावर संसार असणारे गोरगरीब मजूर लोकांची माहिती घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून आपापल्या परीने होईल ते धान्य व कपड्यांचे वाटप करावे जेणेकरून काही लोकांच्या घरी तरी ईद आनंदाने साजरी होईल, अशाप्रकारे सूचना केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व  ठाणेदारांनी शक्य होईल तेवढे गोरगरीब लोकांची माहिती काढून  रोजच्या स्वयंपाकामध्ये लागणारे धान्य तेल व कपड्यांचे वाटप केले आहे.
 सदर बाबी वरून पोलीस दलामध्ये कायद्याच्या कठोर ते बरोबर मायेचा पाझर सुद्धा असतो अशी जण सामान्यातून प्रतिक्रिया उमटत आहे.
पोलीस स्टेशन तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री येतिश देशमुख ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे, पोनि ‌‌ श्री वशिम हाश्मी यांच्या हस्ते सर्व ठाणेदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक पोलीस स्टेशनला वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामुळे अनेक गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून वरिष्ठ पातळीवरून कौतुक करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने