कोरोना चाचणी करणाऱ्या नागरिकांना पाच लाखाचे विमा कवच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते विमा पत्राचे वाटप अंजनवाडा ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रम

कोरोना चाचणी करणाऱ्या नागरिकांना पाच लाखाचे विमा कवच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते विमा पत्राचे वाटप
 अंजनवाडा ग्रामपंचायतच्या स्तुत्य उपक्रम

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा ग्रामपंचायतच्या वतीने ज्या ग्रामस्थांनी कोरोना चाचणी केली अशा नागरीकांचा 5 लाख रुपयाचा विमा उतरवण्यात आला असुन या विमा पत्राचे वाटप शुक्रवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
 दरम्यान अंजनवाडा ग्रामपंचायत कडून नूतन उपक्रम राबवत गावातील ज्या नागरिकांनी कोरोना चाचणी केली आशा नागरिकांचा मोफत पाच लाखाचा विमा उतरवण्यात आला असून नागरिकांना शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमा सुरक्षाकवच पत्राचे वाटप देखील करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करत जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याचे आव्हान केले दरम्यान येणारी तीसरी लाट आणखी भयानक असून गावातील लहान बालकासाठी काळजी घेण्याची आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचे गांभीर्य पाहून लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच गावांमध्ये अनोळखी व्यक्ती आल्यास लहान बालकाचे संरक्षण करावे यापुढील कोरोणा आजार हा भयानक असून कुठली ही सिमटन आढळल्यास लागलीच दवाखान्यात तपासणी करून उपचार घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले तसेच कोरोणा महामारी अनुषंगाने कोरोना चाचणी विमा कवच हा अंजनवाडा ग्रामपंचायत ने राबविलेला उपक्रम जिल्हाभरात लागू करू असे सांगितले याप्रसंगी गावच्या सरपंच यशोदाबाई घोंगडे, तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले, ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किरण घोंगडे माजी पंचायत समिती सभापती दत्तराव लोंढे, उपसरपंच उत्तम चव्हाण, तलाठी पुष्पलता जायभाय,ग्रामसेवक सागर निर्मळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य पंचायत पंजाब चव्हाण, सुमनबाई राठोड, शकुंतलाबाई राठोड, सटवाजी गारोळे धोंडबाराव काचगुंडे, पांडुरंग राठोड मुरलीधर गिरी मधुकर चव्हाण, महादेव खंदारे, बंडू राठोड, अनिल राठोड, महेंद्र घोंगडे आदींची या वेळी उपस्थिती होती प्रास्ताविक किरण घोंगडे यांनी केले, सूत्रसंचालन पंजाब राठोड यांनी केले तर आभार तलाठी पुष्पलता जायभाय यांनी मानले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने