हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाचालकांना अन्नधान्य किटचे वाटप

*उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षा चालकांना जीवनावश्यक कीटचे वाटप*
 
 
हिंगोली,  दि. 01 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने नांदेड नाका चौकात रिक्षा चालकांना जीवनाश्यक कीटचे वितरण सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ॲटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना व सामान्यत: विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराचे माहितीपत्रकही यावेळी वितरीत करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी  जास्तीत जास्त ॲटो रिक्षा चालकांनी सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ॲटो रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**** 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने