विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडून केंद्र शासनाची पाठराखण...
हिंगोली: जिल्हा दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिह्यातील कोविड-१९ स्थितीबाबत आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनी सांगितले की, वापर नसल्यानेच आणि या मशीन भंगारात टाकण्यात आल्यानेच पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर मशीन नादुरुस्त झाल्या असल्याचा आरोप करीत त्यांनी या मशीन चांगल्या असल्याचे सांगत केंद्र शासनाची पाठराखण केली.
हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अगोदर आपल्या दौऱ्याबाबत निवेदन करून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगीतले की, राज्यसरकारने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कर्ज वाटपाकडे लक्ष देण्याची सूचना केली. सध्या पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर मशीन खराब निघत असल्याचे प्रकार देशभरात उघड होत आहेत. तसेच त्यावरून केंद्र सरकारवर टीका सुद्धा होत आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगीतले, की आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता पीएम केअर फंडातून मिळालेल्या सर्व व्हेंटिलेटर मशीन योग्य प्रकारे चालू असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. आपण अनेक रुग्णालयात जावून पाहिले की काही मशीन त्या बरेच दिवस उपयोगात नसल्याने त्यांच्यात बिघाड झाली होती. परंतु तंत्रज्ञाने तपासणी करून पुन्हा त्या मशीन सुरू केल्या. त्यामुळे पी एम केअर फंडातील मिळालेल्या मशीन खराब होत्या, या आरोपात काही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करीत केंद्र शासनाची पाठराखण केली.
टिप्पणी पोस्ट करा