महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने वृक्षारोपण
महाराष्ट्र 24 न्यूज
5,जून2021
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्य़ातील सर्व अंगणवाडी केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली फळझाडे व वृक्ष लागवड करण्यात आली. या फळझाडे व वृक्ष लागवडीसाठी गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती नयना पाटिल, राजकुमार धापसे, श्रीमती सारिका सोरेकर, सर्व पर्यवेक्षिका व सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बालकांच्या उपयोगात येणारे आंबा, लिंबु,चिकु,दाळिंब, संत्री, मोसंबी,शेवगा,सिताफळ, पपई, पेरु यासारखे स्थानिक फळझाडे व ईतर वृक्षांची लागवड करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा