*कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव*
हिंगोली - जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सकाळपासून त्यांच्यावर अधिकारी, कर्मचारी, पत्रकार ,स्नेही यांच्याकडून
शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पत्रकार सुधाकर वाढवे मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी सरांना फेटा बांधून शाल-श्रीफळ देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
आपला जिल्हा कसा कोरोनामुक्त होईल यासाठी रात्रंदिवस त्यांनी आरोग्य अधिकारी सोबत बैठका लावून स्वतः कोरोना सेंटरला वेळोवेळी भेटी देऊन कोरोना आजारातील रुग्णांची विचारपूस करून त्यांना मोठा धीर देऊन त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या वतीने चांगला उपचार करून हजारो नागरिकांना कोरणामुक्त जिल्हा कसा होईल यादृष्टीने त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा आज वाढदिवसानिमित्ताने सकाळपासून विविध अधिकारी, कर्मचार्यांनी त्यांच्यावर पुष्पगुच्छ
देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा