हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक मुंबईत

हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक मुंबईत
-----------------------------------
पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
-------------------------------------
हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक प्रदेशाध्यक्ष तथा आ. अबु असिम आझमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अवहान पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार यांनी केले.
            हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या समाजकार्याची योग्य चर्चा वरिष्ठां पर्यंत गेल्याने वरिष्ठांनी याची दखल घेऊन हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दिनांक 17 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता केवळ हिंगोली जिल्हा करिता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष आणि काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित केलेले आहे. मागील सर्व समाज कार्याचा आढावा, पक्ष बळकटी करिता मार्गदर्शन, येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुकीबाबत मार्गदर्शन आणि हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराला आळा बसविण्याकरिता देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनपर सूचना व प्रतिबंध या सर्व विषयाबाबत मार्गदर्शन आणि सूचना देण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी सुचविले आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आ. अबू असीम आझमी साहेब, प्रदेश महासचिव जुल्फिकार अझमी , परवेज सिद्दिकी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शेख खलील बेलदार यांनी  महारष्ट्र 24 न्यूज बोलताना दिली दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने