अवैधरित्या सागवानाची कत्तल हिंगोली वन विभागाची मोठी कारवाई

सोमवारी सायंकाळी सागवानाची तस्करी करताना परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील करीम खान मेताब खान रा.आजम कॉलनी जिंतूर या व्यक्तीवर वनविभागाकडून भारतीय वनअधिनियमाप्रमाणे करण्यात आली आहे.

सेनगावमध्ये हिंगोली वनविभागाची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

सेनगाव तालुक्यातील खिल्लार परिसरातील सागवानाची बेकायदेशीर कत्तल करुन एका टेम्पोमध्ये भरुन वनविभागाच्या हद्दीतुन निसटून जाण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर वनविभागाकडून अठरा तासानंतर या टेम्पोवर मंगळवारी (ता. सहा) कारवाई करण्यात आली आहे.
सेनगाव तालुक्यातील खिल्लार परिसरातील सागवानाची बेकायदेशीर कत्तल करुन एका (एम.एच.१४ व्ही.३८८४) टेम्पोमध्ये सागवानाची गोल कटाई केलेली ११७ लाकडे भरुन जामदया परिसरातुन हत्ता मार्गे सोमवारी (ता. पाच) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. याच भागातील काही ग्रामस्थांनी या टेम्पोला अडवून धरल्यानंतर सागवानाची तस्करी करणाऱ्यांची विचारपूस केली.
हेही वाचा - आयआरएडी प्रकल्पाची नांदेड जिल्ह्यात अंमलबजावणी
एका व्यक्तीने झालेल्या प्रकाराचा व्हिडीओसुध्दा काढला होता. खिल्लार, आडोळ, जामदया परिसरात दाट झाडी आहे. या ठिकाणी सागवानीचे प्रमाण अधिक असल्याने परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. याच भागातून सोमवारी सायंकाळी सागवानाची तस्करी करताना परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील करीम खान मेताब खान रा.आजम कॉलनी जिंतूर या व्यक्तीवर वनविभागाकडून भारतीय वनअधिनियमा प्रमाणे करण्यात आली आहे.
दरम्यान या टेम्पोमध्ये ११७ सागवानाची लाकडे सापडली असून त्याची किंमत ४५ हजार रुपये तर ९० हजार रुपये किमतीच्या टेम्पोसह १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जी. पी. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ एस. एस. चव्हाण, वनरक्षक खिल्लारे व्ही. बी. राठोड व जामदया येथील वनरक्षक यांनी पाठलाग करुन या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने