तात्कालीन जिल्हाधिकारी जयवंशी यांना निरोप तर पापळकर यांचे स्वागत

तत्कालीन जिल्हाधिकारी जयवंशी यांना निरोप तर पापळकर यांचे स्वागत

बिभीषण जोशीले / सुधाकर म्हलोत्रा
--------------------------------------------
हिंगोली -  तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अकोला येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी जितेंद्र पापळकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जयवंशी यांना निरोप तर पापळकर यांचे स्वागत करण्यात आले.

येथील जिल्हाधिकारी  कार्यालयातील डीपीसी सभागृहात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश 
जयवंशी यांची बदली झाल्याने निरोप समारंभ कार्यक्रम राहिला होता. आज श्री जयवंशी यांनी हिंगोली येथे आले असता त्यांना जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी सत्कार करून मोठ्या मनाने आपल्या अधिकाऱ्याला निरोप दिला तर नवे जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी ,उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर,  जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ अनुप शेंगुलवार, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास पाटील, महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिवानंद मिनगिरे , यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह महसूल कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अयुब शेख रसूल , ततापुरे, सुनील कदम, गोपाल कंठे, आदींनी तत्कालीन व नवे जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना 
जयवंशी म्हणाले, हिंगोली जिल्हा हा लहान असला तरी या ठिकाणी काम करण्यास खूप मोठा वाव आहे. मात्र बदली झालेले अधिकारी या ठिकाणी येण्यास उत्सुक नसतात .लगेच परस्पर झालेली बदली करून घेण्यात धन्य मानतात. परंतू मी या ठिकाणी अडीच वर्षाच्या कार्यकाळात खूप काही शिकलो आहे. कोरोना काळात देखील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले, त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू दर ही कमी आहे. राज्यात जिल्ह्याने अतिशय चांगली कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. नवे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की ,
जयवंशी यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने