*हिंगोली शहरातील पारनेरकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न.*
महाराष्ट्र 24न्यूज
प्रतिनिधी
हिंगोली शहरातील पारनेरकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम संपन्न. दि. २०/०८/२०२१ क्लासच्या विद्यार्थ्यांकडून पहिली गुरुपौर्णिमा पारनेरकर महाराजांच्या मंदिरात( जीवन कला मंदिरात) संपन्न झाली . त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ श्वेता नांदेडकर, श्री शैलेश नांदेडकर, श्री मंगेश पांडे, श्री गजानन रत्नपारखी आणि श्री सुरेश गायकवाड यांची उपस्थिती लाभली. तसेच संवादिनीवर संस्कृती जामकर व तबल्यावर पार्थ कहाकरकर आणि प्रथम कुलकर्णी यांची साथ लाभली. तसेच सलोनी बोइले आणि मुक्ताई रामपूरकर यांनी राग सादर केले. आराध्या क्षीरसागर, सिद्धी जोशी, अक्षरा कान्हेड, नारायणी देशपांडे, निर्जरा महाजन, समृद्धी ढवळे आणि रावि देशपांडे यांनी अभंगाचे सादरीकरण केले. गिटारवर अमोल इंगोले, सम्राज्ञी देशपांडे, व्यंकटेश पिंगळकर, रोहित पाठक आणि ज्ञानेश्वर रामपूरकर यांनी विविध गिटार ट्यून सादर केला. त्याच प्रकारे क्लासच्या संचालिका सौ संस्कृती जामकर यांनी त्यांच्या मधुर आवाजाने सर्व श्रोत्यांचे कर्ण तृप्त केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांकडून गुरु पूजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा