येणारी विधानसभा निवडणूक लढविणार नाही तानाजी मुटकुळे यांची घोषणा

तर विधानसभा निवडणूक लढविणार नाही 

तानाजी मुटकुळे यांची घोषणा


 हिंगोली- शहरातील नागरिकांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलेश्वर तलाव सुशोभीकरण प्रकल्प या पाच वर्षात पूर्ण न झाल्यास येणारी विधानसभा निवडणूक लढविणार नाही ! अशी घोषणा तानाजी मुटकुळे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
 हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पावर युद्धस्तरावर काम सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी सदर सुशोभीकरणाचा प्रस्तावाचे काम नागपूर येथील अभियंत्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, न. प. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व माझ्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत सौंदर्यकरण्याचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. 30 ऑक्टोबरपर्यंत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत दाखल होईल. सदर तलाव परिसरातील नागरिकांना उठवून त्यांना स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये 80 कोटी रुपयांचा निधी तलावाच्या सौंदर्यकरण्यासाठी तर 20 कोटी व 10 कोटी रुपये निधी अनुक्रमे नागरिकांची जमीन व घरे बांधण्यासाठी वापरला जाणार आहे. एक नोव्हेंबर पर्यंत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल झाल्यानंतर सदर प्रस्तावासाठी लागणाऱ्या निधी करिता नितीन गडकरी यांची भेट घेणार असून याकरिता लागणाऱ्या 112 कोटी रुपये निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन गडकरी यांनी यापूर्वीच दिले आहे. सदर निधी प्राप्त होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या पाच वर्षात हे काम पूर्णत्वास न लागल्यास पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही; अशी घोषणा देखील यावेळी तानाजी मुटकुळे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने