युवा प्रदेशाध्यक्ष पदी किरण घोंगडे

*युवा प्रदेशाध्यक्ष पदी किरण घोंगडे*

हिंगोली / प्रतिनिधी 
 रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आंनदराज आंबेडकर औंरगाबाद दौर्यावर आले आसता मिलिंद लाँ काँलेज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आक्रमक नेते जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे यांची रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदि निवड करण्यात आली. या वेळी आंनदराज आंबेडकर यांनी  नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन घोंगडे यांचा नियुक्तीबद्दल सत्कार केला.या वेळी केंद्रीय महासचिव संजीवंजी बौद्धनकर, केंद्रीय सदस्य आंनद नेरलीकर,प्रदेश उपाध्यक्ष मुजीब पठाण,मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमधाडे,उपाध्यक्ष चंद्रकांत रुपेकर,संघटक आंनद कस्तुरे, महासचिव आण्णासाहेब चित्तेकर, मधुकर झगडे ,उपस्थित होते.
एका सामान्य कुटुंबातील व अंजनवाडा या छोट्याशा खेड्यातील युवकांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आंनदराज आंबेडकर यांनी दिल्या मुळे हिंगोली जिल्ह्यात आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
निवडीने राज्य भर शुभेच्छाचा वर्षाव होत आसुन, महाराष्ट्र पिंजुन काढुन रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आंबेडकर चळवळ गतीमान करुन युवकांना सामिल करणार आसल्याचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी  बोलताना सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने