*ग्राम बाल संरक्षण समिती मुलांच्या सुरक्षेसाठी एक प्रभावी यंत्रणा*
मा.जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापाळकर यांचे प्रतिपादन -
हिंगोली येथे ग्राम बालसंरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न झाली - या वेळी जिल्ह्यातील बालविवाह स्थिती व कार्यरत यंत्रणा यांची जबाबदारी या बद्दल मार्गदर्शन केले तसेच परिसरातील लहान बालक किंवा निराधार मुले यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत असुन मुलांच्या सुरक्षेच्या व विकासाच्या दृष्टीने काम करणारी एक प्रभावी यंत्रणा आहे असे प्रतिपादन मा. श्री. संजयजी दैने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी केले. बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २o१५ अन्वये बालकाच्या संरक्षण करिता जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत आहे अश्या यंत्रणांची क्षमता बांधणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून चालू असून त्या अनुषंगाने ग्राम बाल संरक्षण समितीची कार्यशाळा येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात पार पडली.या कार्यशाळेत बालकांचे संरक्षणा बाबत विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले . ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातुन बालकांचे हक्क व संरक्षण होणार असून बालकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समिती व अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले
जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात जिल्हा परिषद षटकोनी सभागृह येथे दिनांक २१.१०.२०२१ रोजी मा.जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री.विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका (सदस्य सचिव)व पोलीस पाटील (सदस्य) यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
सदर प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी श्री.जितेंद्र पापळकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाला प्रमुख उपस्थिती मा.श्री. संजयजी दैने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोलीतसेच श्री.गणेश वाघ जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जिल्हा परिषद हिंगोली हे उपस्थित होते.प्रास्ताविक मा.माया सूर्यवंशी मॅडम यांनी केले यामध्ये त्यांनी उपस्थितांना ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्त्व पटवून दिले.
तसेच या कार्यशाळेत बालकांचे अधिकार, बालकांना विषयी असणारे कायदे व यंत्रणा, लैंगिक अत्याचार ,बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ ,दत्तक विधान प्रक्रिया, बालविवाह अधिनियम २००६ ,इ. विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील यांची उपस्थिती होती.या प्रशिक्षणासाठी परिविक्षा अधिकारी श्री.सुनील वाठोरे निलेश कोटलवार उपस्थित होते प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली तर बाल विवाह बद्दलची माहिती समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी दिली. बाल लैंगिक या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यर्त्या रेश्मा पठाण यांनी दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक चित्रफितीचे प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट व बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा