*आ.संतोष बांगर यांनी उचलला गरीब मुलीच्या डोळ्याच्या ऑपरेशन चा संपूर्ण खर्च...!!!*
*आमदार बांगर हे ठरले जोंधळे कुटुंबीयांसाठी देवदूत....!!!*
*श्रीमती निर्मलाबाई बन्सीधर जोंधळे रा . शास्त्रीनगर कळमनुरी या बौद्ध समाजातील महिलेचा फोन आमदार संतोष बांगर साहेब यांचे स्वीय सहाय्यक आर आर पाटील यांना आला... सदर महिला फोनवर रडत होती... आणि अत्यंत घाबरलेली होती... त्यावेळी आर. आर. पाटील यांनी त्यांना धीर देत शांतपणे विचारले... नेमकं काय झालं ते मला कळू द्या .... त्यानंतर त्या महिलेने सांगितले की... माझ्या मुलीच्या डोळ्याला.. काम करत असताना जखम झालेली आहे.. आणि गल्लीतील मुले सरकारी दवाखाना कळमनुरी येथील घेऊन गेली आहेत... तेव्हा लागलीच आर आर पाटील यांनी पिंटू गडदे(आमदार संतोष बांगर साहेबांचा फोन येताच उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी मध्ये नेहमीच पेशंटची काळजी घेणारा ॲम्बुलन्स चा वाहक) यांना फोन करून तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे पाठवले तेव्हा तेथील डॉक्टरांनी पुनम बन्सीधर जोंधळे तिला पुढील उपचारासाठी हिंगोली रेफर केले परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.... डॉ. लखमावार यांच्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले... ज्या डोळ्यांवर तिला जखम झाली होती त्या डोळ्यांनी तिला काहीही दिसत नव्हते... तिचे बुबुळ फाटले होते... ऑपरेशनचा भरमसाठ खर्च... ऑपरेशन तातडीने करणे गरजेचे... आणि त्यात निर्मलाबाई जोंधळे ही महिला अपंग असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे... त्यांना हिंगोली पर्यंत जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते... तर ऑपरेशनचा खर्च करायचा कुठून... तेव्हा ही बाब आमदारांचे स्वीय सहाय्यक आर आर पाटील यांनी... हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे #देवदूत आमदार संतोष बांगर साहेब यांच्या कानावर टाकली... "जनतेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 24 तास जनसेवेत मग्न असणारे आमदार" अशी ख्याती असलेले संतोष बांगर साहेब यांनी लागलीच डॉक्टर साहेबांना फोन करून सांगितलं की... तो पेशंट माझा आहे जो काही खर्च येईल तो मीच देईन.. त्या मुलीचं आधी ऑपरेशन करा.... मग हिंगोली तील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर लखमावार साहेबांनी कुमारी पूनम बन्सीधर जोंधळे या मुलीच्या फाटलेल्या बुबुळाचे ऑपरेशन करून तिला नवी दृष्टी दिली... आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आमदार संतोष बांगर साहेबांनी हॉस्पिटल कडे धाव घेऊन... त्या मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी केली... आणि तिला धीर दिला.. तिचा हॉस्पिटल चा सर्व खर्च स्वतः आमदार बांगर साहेबांनी उचलला... यानंतर कुमारी पूनमची आई म्हणाली की आम्ही बौद्ध समाजाच्या असून मतदान वंचित ला केले होते... परंतु जेव्हा संकट आलं तेव्हा आमच्या मदतीसाठी कोणीच नाही आलं... आले तर फक्त आमदार संतोष बांगर साहेब... यांचे हे उपकार आम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाही... हे फक्त आमदार नाहीत ते आमच्यासाठी #देवदूत आहेत.. असे म्हणून त्या महिलेने आमदार बांगर साहेबांचे मनातून आभार मानले.... हा सगळा लेखन-प्रपंच करण्यामागे आमदार साहेबांनी मुलीची मदत केली.. हे सांगण्याचा उद्देश नसून आमदार बांगर हे जातीपातीच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणार व्यक्तिमत्व आहे हे सांगण्याचा उद्देश आहे...
टिप्पणी पोस्ट करा