हिंगोलीत निषेध ; हिंगोली मध्ये मुस्लिम बांधवाचा कडकडीत बंद; जिल्हा कचेरी च्या समोर भव्य निषेध सभा ; हजारो मुस्लिम बांधवाचा सहभाग



त्रिपुरा येथील घटनेचा हिंगोलीत निषेध ; हिंगोली मध्ये मुस्लिम बांधवाचा कडकडीत बंद; जिल्हा कचेरी च्या समोर भव्य निषेध सभा  ; हजारो मुस्लिम बांधवाचा सहभाग 

हिंगोली  प्रतिनिधी 
12/11/2021
त्रिपुरा येथिल घटना आणि काही दुकानांची तोडफोड तसेच मुस्लिम महिला व पुरुषाना मारहाण करण्यात आली. या हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी हिंगोलीत मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने कडकडीत  बंद ठेऊन निषेध व्यक्त केलाय.
 त्रिपुरा राज्यांत भरदिवसा मुस्लिम बाधवाना मारहाण करण्यात आल्यानं आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यंना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या निषेध सभेला हजारो मुस्लिम बांधवाचा सहभाग होता. शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी निषेध सभा सुरूवात झाली. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवानी केंद्र सरकारने गांभीर्याने वागण्याची मागणी करून उत्तरप्रदेश येथील योगी सरकारवर सडकून टिका केली. यावेळी त्रिपुरा येथील घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. 
दरम्यान वंचित च्या वतीनेे पा पाठिंबाााा देण्यात आलाा
 दरम्यान आज शहरातील भाजीमंडी परीसरात शुकशुकाट बघायला मिळाला. तसेच शहरातील मुस्लिम बांधवाचे दुकाने कडकडीत बंद होती.  जिल्हयातील कळमनुरी शहरात देखील आपली अस्थापने बंद ठेवून निषेध नोंदवलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव निषेधात सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने