तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील कोणत्या पक्षांमध्ये प्रवेश करणार सर्वांचे लागले लक्ष ...!

तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील कोणत्या पक्षांमध्ये प्रवेश करणार सर्वांचे लागले लक्ष ...!

महाराष्ट्र 24 न्युज 
हिंगोली- नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा माजी प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रवेश करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांचा लवकरच भाजपात कीव इतर पक्षामध्ये  प्रवेश होणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
 हिंगोली नगरपरिषदेचे दबंग मुख्याधिकारी म्हणून रामदास पाटील यांनी आपल्या कामाची छाप पडली होती. हिंगोली शहरासह जिल्हाभरात त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली. शिवाय त्यांचा मोठा चाहतावर्ग देखील निर्माण झाला आहे. परंतु रामदास पाटील यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी निरोप सत्कारप्रसंगी केले होते. त्यामुळे पुढील काळात त्यांची कोणत्या पक्षाकडे वाटचाल राहील याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. मुखेड विधानसभा मतदार संघातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्या नावाची चर्चा पूर्वीपासूनच होती. त्या अनुषंगाने प्रशासकीय सेवेच्या राजीनाम्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत देखील चर्चा रंगू लागल्या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामदास पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील निवडणुकीत देखील मुखेड विधानसभेमध्ये भाजपाकडून रामदास पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. परंतु आता अधिकृत प्रवेशानंतर ते भाजपच्या माध्यमातून मुखेड विधानसभेमध्ये सक्रिय राहणार असल्याचे समजते. भाजपातील पक्षश्रेष्ठींनी देखील रामदास पाटील यांच्या प्रवेशाला सहमती दर्शवली असून लवकरच त्यांचा अधिकृत प्रवेश होईल. अशी  माहिती सूत्रांकडून मिळत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने