हिंगोलीत ट्रॅक्टर सह कृषी साहित्य चोरणारे दोघे गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची बेधडक कारवाई

ट्रॅक्टर सह कृषी साहित्य चोरणारे दोघे गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

हिंगोली- तहसील कार्यालय परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक संदर्भात जप्त करून ठेवलेले ट्रॅक्टर व हिंगोली तालुक्यातील विविध ठिकाणच्या कृषी साहित्यावर डल्ला मारणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज गुरुवारी गजाआड केले आहे.
 जून 2019 मध्ये हिंगोली तहसील कार्यालयाकडून अवैध रेती वाहतुकीसंदर्भात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली होती. सदर ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली तहसील कार्यालय परिसरात उभे करण्यात आले होते. त्यानंतर अज्ञात आरोपींनी सदर ट्रॅक्टर लांबवल्याची बाब उघडकीस आली होती. त्याचबरोबर हिंगोली ग्रामीण, बासंबा, नरसी नामदेव या परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रॅक्टर पेरणीयंत्र, रोटावेटर व मळणी यंत्र असे साहित्य चोरीला गेल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमोल कुंडलिकराव बांगर व लक्ष्मण सुभाष बांगर दोघे राहणार वंजारवाडा हिंगोली अशा दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून सदर चोरी संदर्भात उलगडा झाला. त्यांनी चोरी केलेले सर्व साहित्य एकूण बारा लाख रुपयांचे जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख व पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, अमलदार शंकर जाधव, वसंता चव्हाण, विशाल घोळवे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, ज्ञानेश्वर सावळे, दिनकर बांगर, प्रेमदास चव्हाण, निरंजन नलवार, शेख जावेद, प्रशांत वाघमारे आदींनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने