डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय ऑनलाइन व्याख्यानमाला
आंबेडकरी चळवळीतील लोकशाहीशाहिरीचीं शाहिरी सामाजिक परिवर्तनाची सुयोग्य दिशा दर्शविते. व्याख्याते प्रा. देवानंद पवार कवी गीतकार प्रकाशक ,औरंगाबाद
हिंगोली येथील बौद्ध सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय ऑनलाईन व्याख्यान मालेचे चौथे पुष्प गुंफले.
माननीय सिद्धार्थ गोवंदे प्रकल्प संचालक बार्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रा. शत्रुघन जाधव आदर्श महाविद्यालय, हिंगोली माननीय कैलास भुजंगळे शिक्षण विस्तार अधिकारी हिंगोली, प्रा. डॉ.सुखदेव बलखंडे कै. बाबुराव पाटील महाविद्यालय हिंगोली यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना प्रसिद्ध कवी गीतकार देवानंद पवार यांनी आंबेडकरी चळवळीतील शाहिरांचे समाजप्रबोधनातील योगदान या विषयावर विचार मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीच्या लढ्यासाठी जी चळवळ जिवंत राहण्यासाठी लोकशाहीरांचे योगदान अमूल्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी शाहिरांनी मोठ्याप्रमाणात कार्य केले. गोपाल गायकवाड लक्ष्मण केदार, राजानंद गडपायले यांच्या शाहिरी लेखणीतून समतेचा विचार व न्यायाचा विचार मांडताना दिसून येतो. लोककवी वामनदादा कर्डक यांची एक हजाराच्या वर असलेली गाणी बाबासाहेबांची चळवळ जनसामान्यांच्या डोक्यात नेण्याचे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्रउभारणीचं कार्य करतात. प्रा. देवानंद पवार यांनी व्याख्यानातून आपल्या कविता आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याचं कार्य कशा पद्धतीने करतात हे कविता सादरीकरणातून पटवून दिले. प्रा देवानंद पवार यांनी आपल्या व्याख्यानातून यांनी आपल्या व्याख्यानातून प्रतापसिंग बोदडे, समदूर सारंग, उत्तम फुलकर ,दीनबंधू ,विठ्ठल उमप, राजानंद, गोपीनाथ मिसाळ, नारायण जाधव, डी. आर .इंगळे, प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे,मिलिंद शिंदे व शिंदे परिवार आदींची कवने गायली.
' माया मायचं चित्रांग मले भारत दिसते,
तिचा उडता पदर मले तिरंगा भासते,
तिच्या कपाळावरच कुंकू अशोक चक्र दिसते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते.'
आपल्या स्वरचित कविता सादरीकरणातून समता मूलक समाज निर्मितीचा परिवर्तनशील प्रखर आशावाद मांडला. शिवाय लोकशाहीरांच्या शाहिरीतून सामाजिक परिवर्तन घडविण्याचे कार्य निष्ठेने केल्या जाते असे विचार आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना प्राध्यापक डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी चार दिवस चाललेल्या व्याख्यानमालेचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. ऑनलाईन व्याख्यानमाला पार पाडण्यासाठी तंत्र सहाय्यक म्हणून बालाजी जबडे यांनी काम पाहिले चौथ्या पुष्पाचे सूत्रसंचालन प्रवीण रुईकर यांनी केले. तर आभार रमेश खंदारे यांनी मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. सचिन हटकर, इंजिनीयर भीमराव कुरवाडे, सुभाष भिसे, बबन दांडेकर ,भीमराव तुरुक माने , गंगाधर पाईकराव अंन्तिदास इंगोले, विजय कवाने प्रा. डॉ.बाळासाहेब साळवे डॉ. कृष्णा इंगळे, बी.बी.भगत, प्रदीप इंगोले, एड. अनिल इंगळे ,विश्वनाथ लोणकर ,रामा वाकळे ,अनिल पुंडगे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा