चैन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी गजाआड, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चैन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी गजाआड, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही 

हिंगोली : शहरातील शिवाजी नगर परिसरात मंदाकिनी सोनमळे ही महिला रस्त्याने पायी चालत असताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोटार सायकल वरील दोन चोरट्यांनी  चार सायकल भरधाव वेगात येऊन या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते. सदरील प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक येतीस देशमुख यांना योग्य त्या सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय गुन्हा उघड करण्याबाबत निर्देश दिले. या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले.

  या पोलीस पथकाने शहरात अनेक ठिकाणी व्हिडिओ फुटेज तपासून गोपनीय माहिती च्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्ह्यातील आरोपी हे कर्नाटक राज्यातील बिदर येथील प्रख्यात इराणी टोळीचे सदस्य असून टोळीचा आंतरराज्य टोळीशी  संबंध होते तसेच कर्नाटक, महाराष्ट्र,तेलंगणा मध्य प्रदेश,अशा राज्यात अनेक गुन्हे करून फरार होते. 
  त्यांना पकडणे मोठे जिकरीचे असल्याने पोलीस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास कौशल्य व गोपनीय माहिती वापरून माहिती काढली असता हे आरोपी भोपाळ येथून पळून गेले असून रेल्वेने हैदराबादला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी बल्लारशहा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क करून योग्य समन्वय साधल्याने सदर आरोपी बल्लारशहा पोलिसांच्या मदतीने हिंगोली पोलीस पथकाने बल्लारशा येतून जाफर हुसेन व  समीर अली या दोघांना ताब्यात घेतले.

  सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीची विचारपूस केली असता त्यांनी एकूण पाच गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चोरीला गेलेले दागिने व अन्य मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने