हिंगोलीत मोकाट जनावरांचा मुक्त संचार....!
हिंगोली -
शहरातील जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, रिसाला बाजार, नांदेड नाका आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे मात्र पालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे.
येथील मुख्य रस्त्यावर ,बाजारपेठेत, वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त वावर होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.शहरातील हिंगोली -अकोला हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठी वर्दळ सुरू असते. ऐन मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या धरून कळपच्या कळप बसत आहेत. याबाबत अनेक वेळा पालिकेकडे निवेदन देऊन, किंवा तक्रारी देऊन ही दखल घेतली नाही. मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांना दंड ठोठावला पाहिजे होता, परंतु तसे होत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे मालक मुद्दामहून आपली जनावरे रस्त्यावर सोडून देत मोकळे होत आहेत. परंतू या मोकाट जनावरमुळे अपघात होऊन किती निष्पाप लोकांना प्राण ही गमवावे लागले आहेत. तर अनेक जन या अपघातात किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतानाही पालिका प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे.मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरली आहे.
तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मोकाट जनावरांसाठी मोहीम सुरू केली होती, मोकाट जनावरांना कोंडवाड्यात डांबून ठेऊन पशु मालकांना दंड ठोठावण्यात आला होता. आता मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांनी मोकाट जनावरे रस्त्यावर सोडल्यास पशु मालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. परंतू अद्यापही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास डॉ. अजय कुरुवाडे यांना देखील अपयश आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा