खंडणी प्रकरणाला नवे वळण ; तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्याकडे वर्ग
हिंगोली - खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. प्रथम तपास केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालल्यामुळे तो तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र तो तपास त्यांच्याकडून काढून सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याने तपासाची चक्रे जलदगतीने फिरण्यास मदत मिळणार आहे.
शहरातील बळसोंड भागातील संतोष आचम यास अश्लील व्हिडीओ काढून त्याला सोशल माध्यमातून बदनामी करून धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या वाशिम येथील आरोपी राहुल सुरेश कांबळे, आकाश उर्फ गणेश त्र्यंबक जिरवनकर या दोन आरोपीना २२ जानेवारी रोजी बासंबा पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपासाची चक्रे फिरवीत असतानाच या प्रकरणात पाळी मुळे खोल रुजत चालले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. हे तपास करण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक आरोपी यात अडकण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत आहे.
हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख हे करणार असून, या प्रकरणात तपासानंतर हिंगोली जिल्ह्यात हे प्रकरण उघड होऊन आरोपी गजाआड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी तपासा नंतरच सर्व प्रकरण उघड होणार.
दरम्यान, याप्रकरणी मागील आठ दिवसांपूर्वी राहुल कांबळे , आकाश उर्फ गणेश जीरवनकर या आरोपींना २७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना दिलेली चार दिवसाची पोलीस कोठडी संपल्यामुळे आता पुन्हा हिंगोली जिल्हा न्यायालयाने एक दिवस त्या आरोपीना सरकारी वकिल अनिल इंगळे यांनी सरकारची बाजू मांडत पोलीस कोठडी सुन्यावण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा