पद्मश्री डाॅ. सिंधुताई सपकाळ यांना शोकसभेत श्रद्धांजली

पद्मश्री डाॅ. सिंधुताई सपकाळ यांना शोकसभेत श्रद्धांजली 

हिंगोली ( प्रतिनिधी)
 भरारी परिवार व आई जगदंबा प्रतिष्ठान एनटीसी हिंगोली च्या वतीने पद्मश्री डाॅ. स्व. सिंधुताई सपकाळ यांना शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

 रविवार दि. ९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी हिंगोली येथे पद्मश्री डाॅ. सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली अर्पन करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेच्या सुरूवातीला श्रध्देय माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कल्याण देशमुख यांनी अनाथाच्या माई श्रध्देय सिंधुताईं यांच्या आठवणी सांगीतल्या. तसेच हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या आठवणीना उजाळा देऊन माईचा आधारवड हरवला असू सांगून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभत हिंगोली शहराच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई सुर्यतळ, जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या मालतीताई कोरडे, संगिताताई निलावार , उमाताई तांडूरकर, जिजाऊ ब्रिगेड च्या  उपप्रदेशाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, छायाताई मगर, प्रा. ज्योतीताई भिसे, योगिताताई देशमुख, लोखंडेताई, वैशालीताई पाटील, भुमरे ताई, अरूणाताई ठाकरे, जगजितकौर अलग, वंदनाताई धुत, दिलीप घ्यार, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आनंद निलावार, प्रा. डाॅ. शिवाजी वायभासे, 
, चिंतामणी गुठ्ठे, उत्तमराव लोंखडे, संजय भुमरे, इरवंत बत्तलवाडीकर,  प्रा. नरेंद्र रायलवार, श्री. पारेकर काका,  सुखबिरसिंग अलग, संतोष आचम, बाबुराव ढोकणे यांच्यासह महिला भगिनी, नागरिक, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने