अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या वीस वर्षीय तरुणाला चार दिवसाची पोलीस कोठडी ठाणेदार मलपिलू

अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या वीस वर्षीयआरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी ठाणेदार मलपिलू 

    दिनांक 01/01/2022 रोजी दुर्गसावंगी येथील ईसम यांनी पोलीस स्टेशन बासंबा येथे येऊन फिर्याद दिली की माझी मुलगी वय 14 वर्ष ही अल्पवयीन असताना सुद्धा आरोपी नामे वैभव सुधाकर मलगुंडे राहणार दुर्गसावंगी यांनी फूस लावून दिनांक 31/12/2021 रोजी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरून दुर्गसावंगी येथून घेऊन गेला. वगैरे फिर्याद वरूण पोलीस स्टेशन बासंबा येथे दिनांक 01/01/2022 रोजी गुरन 01/2022 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर पीडित अल्पवयीन मुलगी हिच्या जीविताची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने शोध लागणे अत्यंत आवश्यक होते. लागलीच पोलीस स्टेशन बासंबा येथील सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलीस हवालदार नानाराव पोले, पोलीस शिपाई अशोक काकडे, मपोना सारिका राठोड, सायबर सेल हिंगोली येथील पोलीस शिपाई सुमित टाले  यांनी तपासाची चक्रे फिरवून  आधुनिक तंत्राचा वापर करून अतिशय गोपनीय पद्धतीने जलद गतीने तपास करून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेलेल्या आरोपीस व पीडित मुलीस दिनांक- 10/01/2022 रोजी पुणे जिल्ह्यातील बावधन परिसरातून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन बासंबा हिंगोली येथे आणले आहे पीडित मुलीस आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले असुन व आरोपीस अटक करुन त्याचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक तपास चालु आहे.....
. सदरची कारवाई  मा.पोलीस अधीक्षक श्री.एम.राकेश कलासागर साहेब,  अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे साहेब, सहा.पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली बासंबा ठाण्याचे ठाणेदार प्रभारी राजेश मलपिलु, पोहवा. नानाराव पोले, पोशी अश्रूजी काकडे, महिला पोशी सारिका राठोड व सायबर सेल हिंगोली येथील पोशी सुमित टाले यांनी केली....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने