चुकीच्या पद्धतीने रोजगार सेवकांची निवड केल्याची तक्रार
नर्सी नामदेव -
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे २६ जानेवारी रोजी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजित केले होते. सदरील ऑनलाईन घेतलेल्या ग्रामसभेमध्ये ऑनलाईन पद्धतीने ग्रामस्थांकडून मतदान घेऊन ग्राम रोजगार सेवक पदाची निवड झाल्याचे ग्रामसेवक यांनी घोषित केले.
नर्सी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मागील चार पाच वर्षांपासून ग्राम रोजगार सेवकाचे पद रिक्त होते. यासाठी तीन वेळा ग्रामपंचायतकडून अर्ज मागविण्यात आले होते.
सन २०२१ मध्ये घेतलेल्या अर्जामध्ये सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २६ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन ग्रामसभेमध्ये सहा पैकी एका उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे रोजगार सेवक पदासाठी अर्ज दिलेल्या सहापैकी चार ते पाच उमेदवारांना रोजगार सेवक पदाच्या निवडी संदर्भात ग्रामपंचायत कडून ऑनलाईन पद्धतीने निवड होण्या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना किंवा संपर्क साधण्यात आला नव्हता, त्यामुळे निवडीपासून इतर उमेदवारांना वंचित राहावे लागले.
तरी ही चुकीच्या पद्धतीने केलेली निवड रद्द करुन आलेल्या अर्जापैकी उच्चशिक्षण अर्हतेनुसार किंवा लेखी परीक्षेव्दारे पुन्हा नव्याने निवड करण्यात यावी अशी मागणी गटविकास अधिकारी हिंगोली तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे बि. के. इंगोले, गणेश थोरात, तस्लिमखान पठाण या अर्जदारांनी २७ रोजी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा