काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गव्हासह ट्रक जप्त
हिंगोली - जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचा रास्तभाव असलेला गहू काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने घेऊन जाणारा बारा लाख ३२ हजार ८२२ रुपयांचा ट्रक पोलिसांनी( दि.१३ ) जानेवारी रात्री सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरात पकडला, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी दोघांवर गुन्हा दाखल झाला.
रास्तभाव दुकानाचा बारा लाखाचा गहू चढ्या दराने विक्रीसाठी काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम .एच ४०,बिजी ५४८६ हा औंढा मार्गे नांदेडकडे जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात १९हजार ८७०किलो आढळून आला .हा ट्रक हिंगोली शहरातील फलटण भागातील शेख रउफ खा युनूस खा पठाण यांच्या मालकीचा असल्याचे चालक बालाजी गायकवाड राहणार धनेगाव नांदेड यांनी सांगितले.या ट्रक मध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाचे प्लस्टिक खताच्या पोत्यात तीन लाख ३२ हजार रुपयांचा गहू तर नऊ लाख रुपयांचा ट्रक असा मिळून एकूण बारा लाख ३२ हजार ८२२ रुपयांचा माल जप्त केला .शहर वाहतूक शाखेचे फुलाजी सावळे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघणे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा