सार्वजनिक शिवजयंती महाेत्सवाची जय्यत तयारीतीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयाेजन

सार्वजनिक शिवजयंती महाेत्सवाची जय्यत तयारी
तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयाेजन
हिंगाेली/प्रतिनिधी
19 फेब्रुवारी राेजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महाेत्सव समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.
दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती महाेत्सवाच्यावतीने हिंगाेली शहरात भव्य दिव्य शिवजन्माेत्सव साजरा करण्यात येताे. यंदाही तीन दिवस शिवजन्माेत्सव साजरा करण्यात येणार आहे.17 फेब्रुवारी राेजी सकाळी 11 वाजता महिला व पुरूष अशा दाेन गटात कबड्डी स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 2 वाजता फुटबाॅल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. 18 फेब्रुवारी राेजी सकाळी 10 वाजता दाेन गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयाेजन, सकाळी 11 वाजता भव्य कुत्यांची दंगल, दुपारी 12 वाजता महिला मुली व बालकांसाठी ऐतिहासिक वेशभुषा व संवाद स्पर्धा हाेणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिला व मुलींसाठी रांगाेळी स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात 5 हजार दिव्यांचा दिपाेत्सव शिवरायाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 ते 10 यावेळेत नांदेड येथील डाॅ. शिवराज शिंदे यांचा शाहीरी जलसा व शिवगितांचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारी राेजी सकाळी 6 वाजता शिव अभिषेक, सकाळी 8 वाजता ध्वजाराेहण, शिव पाळणा, शिव पुजा आणि शिवगजर सकाळी 9 ते 10.30 या वेळेत छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरातून दुचाकी रॅली, सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वळेत रक्तदान शिबिर व काेविड लसीकरण शिबिर, सकाळी 10.30 ते दुपारी 3 या वेळेत शहरातून ढाेलपथक, रथ, घाेडे, लेझीम, लाठी-काठी, झांज पथक देखाव्यासह भव्य मिरवणुक, दुपारी 4 ते 6 यावेळेत शिव विचारपीठावर मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाèया 5 जणांना श्री शिव छत्रपती गाैरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात नेत्रदिपक अतिषबाजी व ताेफची सलामी, सायंकाळी 6.30 वाजता शिवरायांच्या चरणी 5 हजार दिव्यांचा दिपाेत्सव व सायंकाळी 7 ते 10 यावेळेत शिवशाहीर सुरेश जाधव यांचा शिवपाेवाडे व शिवगितांच्या दणनणीत कार्यक्रमाने शिव जन्माेत्सवाची सांगता हाेणार आहे. तरी जिल्हाभरातील सर्व शिवप्रेमिंनी या सार्वजनिक शिवजयंती महाेत्सवाला उपस्थितीती लावावी असे आवाहन सार्वजनिक शिवयंती महाेत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने