वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. पठाण तर कार्याध्यक्ष पदी ऍड.नरसीकर
हिंगोली - वकील संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून जिल्हाध्यक्ष पदी ऍड. मतीन पठाण तर कार्याध्यक्ष पदी ऍड. किरण नरसीकर यांची निवड करण्यात आली.
येथील जिल्हा सत्र न्यायालयात वकील संघाचे मार्गदर्शक तथा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी व एकोपा रहावा यासाठी ही निवडणूक बिनविरोध काढण्यात आली. यामध्ये वाटाघाटी नुसार असे ठरले की, ३१ जुलै पर्यन्त ऍड मतीन पठाण हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतील तर ऍड. किरण नरसी कर हे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम पाहतील तसेच पुढील वर्षी एक ऑगस्ट २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऍड. किरण नरसीकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतील तर ऍड मतीन पठाण हे त्यांना सहकार्य करतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. अनिल तोष्णीवाल, ऍड. के. जे. आरगडे यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा