पोतरा येथील महिलांनी एकत्र येत दारु विक्रेत्याला मुद्देमालासह घेतले ताब्यात....!
आखाडा बाळापूर
कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे गावातील महिलांनी एकत्र येत एका दारु विक्री करणाऱ्या महिलेला मंगळवारी दारुच्या बाँक्स सह ताब्यात घेतले पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करत पकडलेल्या दारूचे रस्त्यावरच प्रदर्शन भरवले.
आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पोतरा येथे अनेक दिवसापासून अवैध देशी दारु विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या बाबत वारंवार तक्रारी देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी रेखा चेभेले, उर्मिला बर्गे ,अंजनी जामकर, सोनाबाई चौधरी, रेणुका खुडे, सुनिताबाई रानगिरे, अंकिता बाई झुंगरे, उर्मिला मुलगीर, संरपच रघुनाथ गुहाडे सामाजिक कार्यकर्ते विजय मुलगीर, विकास रानगिरे बालु रानगिरे, रघुनाथ पाटील, धाराजी मुलगीर, प्रभु पाटील, देवानंद मुलगीर, राजकुमार मुलगीर ,राधेश्याम चेभेले आदींनी एकत्र येत सापळा रचून दारूचे बॉक्स पकडले .
दारू विक्रेत्यांना आ. बाळापूर पोलिसांचे अभय असल्याचा आरोप करत या महिलांनी देशी दारूच्या बाटल्यांचे रस्त्यावर प्रदर्शन मांडत पोलिसांच्या विरोधात तासभर रास्ता रोको केला. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप पाहून बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत कार्यवाही सुरू केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा