कमलानगर येथे माता रमाई जयंतीनिमित्त आदर्श मातांचा सत्कार



कमलानगर येथे माता रमाई जयंतीनिमित्त आदर्श मातांचा सत्कार 

हिंगोली -
शहरातील कमलानगर येथील राजगृह बुद्ध विहार येथे माता रमाई यांची जयंती  सोमवारी (ता. ७)  साजरी करून यावेळी आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव रणवीर व प्रमुख अतिथी म्हणून भारत इंगोले, किशोर वाढे यांची उपस्थिती होती. माता रमाई जयंती निमित्त कमलानगर येथील निवडूंगे निलावती निवृत्ती, कापसे अवंतिका नारायण, नरवाडे जिजाबाई भीमराव, इंगोले पंचशीला भारत,  पुंडगे ज्योती भिमराव,  खंदारे चारुशीला अशोकराव, भुक्तर लक्ष्मीबाई, दिपके वंदना बबनराव, दिपके वच्‍छलाबाई आदी आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला. तसेच साक्षी रामा वाकळे एमबीबीएस पात्र झाल्यामुळे आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला. तसेच सुधाकर नरवाडे यांचा मुलगा एमबीबीएस पात्र झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.

 यावेळी भीमराव नरवाडे, सुरेश लोणकर, रामा वाकळे, किशोर वाढे, शोभा मोगले, मिनाबाई कांबळे, इंदुबाई इंगोले, कमलबाई इंगोले, सविता वाठोरे, नीता नरवाडे, शशिकला नरवाडे, दीक्षाबाई बलखंडे, धबडगे, धवसे तसेच कमलानगर येथील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश इंगोले यांनी केले तर आभार रामा वाकळे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने