अकोला-पूर्णा विद्युतीकरणा साठी १०२ कोटीचा निधी मंजूर



अकोला-पूर्णा विद्युतीकरणा साठी १०२ कोटीचा निधी मंजूर

हिंगोली

हिंगोली -  अकोला- पूर्णा रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यासाठी आता डिझेल ऐवजी विजेवर चालणार असल्याने त्यासाठी विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर असून, त्यासाठी१०२ कोटीचा निधीची तरतूद करण्यात आली.

नुकताच केंद्र सरकारच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला.यामध्ये अकोला-पूर्णा मार्गावर विद्युतीकरणा साठी रेल्वे मंत्रालयाने या अर्थसंकल्पात १०२ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.अकोला- वाशीम, कण्हेरगाव मार्गे हिंगोली स्थानकाच्या पश्चिम दिशेला औटर पर्यन्त विद्युत पोलवर विद्युत तारा जोडण्याचे  काम करण्यात आले आहे.तर हिंगोली ते नव्हलगाव दरम्यान काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्युत जोडणीचे काम रोखण्यात आले होते. रविवारी  माल वाहू इंजिनच्या साहाय्याने विद्युत पोलवर वीज वाहिनी जोडण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १०२ कोटीचा निधी उपलब्ध झाल्याने विद्युतीकरण कामास गती मिळणार असल्याची अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू यांनी व्यक्त केली. विद्युतीकरण असो किंवा या मार्गावर रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून  गणेश अण्णा नेहमीच प्रयत्न करीत असतात .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने