हिंगोली शहर पोलीस च्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे जागतिक महिला दिना निमित्त पोलीस निरक्षक श्री पंडित कच्छवे साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व निर्भया समिती च्या सदस्य सौ संगीता चौधरी, संजिवनी मस्के,सौ.सोनाली परतवार, सौ, विद्या ताई पवार सौ अर्चना ताई जाधव सौ कांचन सोनार,सौ नंदा वाघ कु किरण सोनार कू नेहा जगतकर तसेच पोलीस स्टेशन हिंगोली शहर च्या सौ गंगा गावंडे, नंदा धोंगडे, शारदा ढेंबरे, अस्मिता उदगिरे स्वाती पिंपरे या हजर होत्या निर्भया समिती च्या प्रमुख मिरा बामणीकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले या वेळी आयोजित कार्यक्रमात  महिला पोलीस कर्मचारी तसेच होम  गार्ड महिला कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने