आग्या मोहोळाच्या मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी, एक गंभीर



आग्या मोहोळाच्या मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी, एक गंभीर*

या तहसील कार्यालयात उडाला एकच गोंधळ

हिंगोली - आज दुपारी हिंगोलीच्या सेनगाव येथील तहसील कार्यालयामध्ये आग्या मोहोळाच्या माशांनी एकच गोंधळ घातला आहे. कार्यालयाच्या इमारतीला बसलेल्या मोहळा वरील मधमाशांनी तहसील परिसरात असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये एकूण ८ ते ९ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर सेनगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी माधव कंठाळे त्यांना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. माधव यांचा नाकात आणि कानात मधमाशांनी चावा घेतला. सोबतच अन्य ८ जनावर सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश राघोजी वैद्य, बालाजी नारायण गुट्टे, हर्ष अंभोरे, घनश्याम अशी काही जखमी लोकांची नावे समोर आली आहे. सदरील प्रकार हा दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडला आहे. जिवाच्या आकांताने नागरिक सैरावैरा धावत होते. घडलेल्या प्रकारामुळे तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने